पु. ल. देशपांडे जयंती : आनंदोत्सव

पु. ल. देशपांडे जयंती : आनंदोत्सव

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या अंधेरी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व – प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, गायक, अभिनेते, वक्ते पु. ल. देशपांडे यांना त्यांच्या जयंती निमित्त विविधरंगी कार्यक्रमांद्वारे आदरांजली वाहिली.
शाळेच्या मराठी मंडळाने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाची सुरुवात पु. लं. च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. शिक्षिका सौ. स्वाती बापट यांनी आपल्या भाषणातून पु. लं. च्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची, तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून दिली. पु. ल. आपल्या पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेचे विद्यार्थी होते ही विशेष अभिमानाची बाब त्यांनी नमूद केली. पु. लं नी संगीत दिलेल्या ‘नाच रे मोरा’ या सदाबहार गाण्यावर शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. पु. लं. च्या पुस्तकांतील निवडक उता-यांचे अभिवाचन करून विद्यार्थी कु. रमा मिस्त्री, चि. श्लोक करांडे, शिक्षिका सौ. सुप्रिया साळकर आणि सौ. कल्पिता भिडे यांनी कार्यक्रमात मिष्कील रंग भरले. सखाराम गटणे (व्यक्ती आणि वल्ली), माझे पौष्टिक जीवन (हसवणूक), अपूर्वाई, असा मी असामी या पु. लं च्या सदाबहार पुस्तकांतील हलक्या-फुलक्या विनोदाने सभागृहातील वातावरण प्रसन्न झाले .
या निमित्ताने शाळेच्या वाचनालयातील पु. लं. च्या पुस्तकांचे प्रदर्शन शिक्षिका सौ. स्वरा जंगम यांनी
आयोजिले. प्रत्येक पुस्तकाबरोबर त्याचा सारांश अथवा मतितार्थ त्यांनी नेटकेपणाने मांडला.
फलकावर प्रदर्शित पु. लं. चे चित्र रूपातील काही निवडक विनोद लक्षवेधक ठरले.
या कार्यक्रमांद्वारे पु. ल. देशपांडे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व विनोदी तसेच विचारप्रवर्तक साहित्याचा आनंद घेणे यासाठी प्रयत्न केले गेले.

 
 
 
 
 
 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow