चालला नामाचा गजर…

चालला नामाचा गजर…

सालाबाद प्रमाणे यावर्षीही दिनांक १६/०७/२०२४ रोजी PTVA’s English Medium school , Andheri या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिशय उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक दिंडीने झाली. विजयनगर सहनिवासाच्या परिसरात निघालेल्या या दिंडीमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत व त्यांनी विठ्ठल नामाचा जयघोषात सामिल झाले. शाळेच्या सभागृहात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम मुख्याध्यापिका माननीय सौ. मृणालिनी म्हेत्रे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची आरती करण्यात आली. शाळेतील शिक्षिका सौ. स्वाती बापट यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या भाषणात त्यांनी तुळशीचे महत्व, वारी, पुंडलिकाची गोष्ट इ. सर्व गोष्टींचा समावेश केला.
इयत्ता चौथीचा विद्यार्थी कु. कैवल्य गोकर्णकर याने “तू वेडा कुंभार” हा अभंग विद्यार्थ्यांसमोर सादर केला. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनींनी भारुड सादर केले. या भारुडामध्ये तुळशीचे महत्त्व सांगण्यात आले तसेच नद्यांचे प्रदूषण करू नये हा संदेश देण्यात आला. अभंग व भारुड या दोन्हीही कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका सौ. काव्या राणे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर ‘गजर माऊलीचा’ हा नृत्यविष्कार इयत्ता पाचवी, सहावी व आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केला यासाठी सौ. चरिता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत जनाबाई ,संत गाडगेबाबा इत्यादी संतांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
दरवर्षी पंढरपूरला जाणा-या वारीतील अनेक रोचक गोष्टींचे वर्णन करणारा ‘What is Wari?’ हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. इयत्ता आठवीतील पिनाक पटवर्धन या विद्यार्थ्याने वारकरी कीर्तन सादर केले. या कीर्तनामधून त्याने “चित्ती समाधाने तरी विष वाटे सोने” या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे निरूपण केले. कार्यक्रमाची सांगता प्रसाद वाटपाने झाली.

सौ. चरिता कुलकर्णी

(PTVA’s English Medium school , Andheri शाळेतील शिक्षिका)

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow